सोलापूर दि. 20 : - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हे तर आधुनिक भारताचे निर्माते, मानवतेचे उद्गाते तसेच विश्वभूषण असे नेते होते, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागाचे उपसंचालक यशवंत भंडारे यांनी केले. येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये ‘राष्ट्र निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहायक कोषागार अधिकारी सूर् यकांत खटके होते. श्री.भंडारे पुढे म्हणाले की, देशात सुमारे 85 टक्के इतका वर्ग उपेक्षित असून या सर्वांचे आत्मभान जागृत करण्याचे महान काम डॉ.बाबासाहेबांनी केले आहे. सध्या महान व्यक्तींच्या विचारांना हळुवारपणे संपविण्याचे कार्य चालू आहे की काय अशी शंका येण्याइतपत देशात परिस्थिती निर्माण झाली आहे. थोरांच्या विचारांना संपविणे म्हणजेच पर्यायाने अंधार युगाकडे वाटचाल असल्याचे सांगून ते म्हणाले की, आज देशाला तथागत गौतम बुध्द, महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज , आगरकर यांच्या विचारांची गरज आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ घटना लिहिण्याचेच काम केले नसून देशातील क...