प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?
भारतरत्न संपादक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात मूकनायक पासून केली ... ३१ जानेवारी १९२० रोजी त्यांनी मुकनायकची सुरुवात केली ... त्यांचवेळी बाबासाहेब सिडने ह्याम कॉलेज मध्ये प्राध्यापक होते त्यामुळं मुकनायकचं संपादक पद त्यांनी पांडुरंग नंदराम भटकर यांच्याकडे दिलं ... ५ जुलै १९२० रोजी उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब लंडनला गेले ... जानेवारी ते जुलै १९२० या सुमारे पाच महिने २५ दिवस बाबासाहेब मुकनायकचं स्वतः काम पहात होते ...स्फुट , अग्रलेख लिहीत होते ...त्यांनी या काळात १४ लेख लिहिल्याची नोंद सापडते ...मूकनायक बंद पडल्यानंतर त्यांनी ३ एप्रिल १९२७ रोजी " बहिष्कृत भारत " हे पाक्षिक सुरू केलं ... मूकनायक सुरू करताना मूक समाजाचं नेतृत्व बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलं होतं ... अन " त्यांच्या लेखनातील शब्दा सवे मुके बोलू लागले ..." तसे बाबासाहेबांनी भारतातील बहिष्कृतांच्या वेदनेला वाचा फोडण्याचं काम बहिष्कृत भारत च्या माध्यमातून केलं ... त्यानंतर बहिष्कृत भारत ही आर्थिक विवंचनेमुळं बंद पडला...पण बहिष्कृत भारतातील जनतेचे प्रश...






Comments
Post a Comment